Ad will apear here
Next
शर्ले नाइट
ब्रॉडवे आणि हॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री शर्ले नाइट हिचा पाच जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये तिचा अल्प परिचय...
....
पाच जुलै १९३६ रोजी कान्सासमध्ये जन्मलेली शर्ले नाइट ही ब्रॉडवे आणि हॉलिवूडमधली अभिनेत्री आहे. तिने ५०हून जास्त सिनेमांत भूमिका साकारल्या आहेत. ‘दी डार्क अॅट दी टॉप ऑफ दी स्टार्स’ आणि ‘स्वीट बर्ड ऑफ यूथ’ यातल्या अभिनयासाठी तिला ऑस्कर नामांकन मिळालं होतं. जगरनॉट, दी काउच, हाउस ऑफ विमेन, दी ग्रुप, दी काउंटरफेट किलर, दी रेन पीपल, फ्रेंडली पर्सुएशन असे तिचे सिनेमे गाजले होते. डचमन या फिल्मसाठी तिला वोल्पी कप पुरस्कार मिळाला होता. ब्रूक शील्ड्सच्या ‘एंडलेस लव्ह’मध्ये तिची महत्त्वाची भूमिका होती. पेट्यूलिया, अॅज गुड अॅज इट गेट्स, ग्रॅन्डमाज बॉय, प्रिझनर्स, केनेडीज चिल्ड्रेन, डायबॉलीक, ए हाउस ऑन ए हिल, सेक्सुअल लाइफ, एलेव्हेटर, पॉल ब्लार्ट : मॉल कॉप, हे तिचे आणखी काही गाजलेले सिनेमे. टेलिव्हिजन सीरियल्समधल्या कामांसाठी तिला आठ वेळा एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालं होतं आणि एकूण तीन वेळा एमी पुरस्कार मिळाले होते. तिला गोल्डन ग्लोब पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. 

यांचाही आज जन्मदिन :
द. पां. खांबेटे आणि आनंद साधले (त्यांच्याविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
द. पां. खांबेटे यांची पुस्तकं बुकगंगा डॉट कॉम वरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
आनंद साधले यांची पुस्तकं बुकगंगा डॉट कॉम वरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZYKBQ
Similar Posts
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी ‘तू माझी अन् तुझा मीच ही खातर ना जोवरी, प्रीतीची हूल फुकट ना तरी!’ म्हणणारे लोकप्रिय कवी आणि लेखक अनंत काणेकर आणि प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे डॉ. अ. वा. वर्टी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे ‘माझ्या मराठी मातीचा मला जिवापाड छंद,’ असं लिहिणारे कवी विठ्ठल वाघ, आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, अठराविश्वे दारिद्र्य यांचं विदारक वर्णन करणारे उत्तम तुपे, ‘राघववेळ’ सारखी जबरदस्त कादंबरी लिहिणारे नामदेव कांबळे, विनोदी कथाकार राजाराम राजवाडे, ‘ए पॅसेज टू इंडिया’सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा लेखक इ
विल्यम ट्रेव्हर परिणामकारक लघुकथालेखनासाठी नावाजल्या गेलेल्या विल्यम ट्रेव्हरचा २४ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language